एवढंच ना?
[ आयुष्यावर बोलू काही च्या उत्तरार्धाची सुरुवात अनेकदा या कवितेने होते. ]
एवढंच ना? एकटे जगू.. एवढंच ना?
आमचं हसं, आमचं रडं, घेऊन समोर एकटेच बघू,
एवढंच ना?
रात्रीला कोण? दुपारला कोण? जन्माला अवघ्या या पुरलंय कोण?
श्वासाला श्वास, क्षणाला क्षण, दिवसाला दिवस जोडत जगू!
एवढंच ना?
अंगणाला कुंपण होतंच कधी, घराला अंगण होतच कधी,
घराचे भास , अंगणाचे भास, कुंपणाचे भासच भोगत जगू,
एवढंच ना?
आलात तर आलात, तुमचेच पाय, गेलात तर गेलात कुणाला काय?
स्वतःचं पाय, स्वतःचं वाट, स्वतःचं सोबत होऊन जगू
एवढंच ना?
मातीचं घर, मातीचं दार, मातीच घर, मातीच दार
मातीचं घर, मातीचं दार, मातीच्या देहाला मातीचे वार
मातीचं खरी, मातीचं बरी, मातीत माती मिसळत जगू
एवढंच ना?
Showing posts with label --- संदीप खरे.. Show all posts
Showing posts with label --- संदीप खरे.. Show all posts
Sunday, August 22, 2010
Wednesday, July 1, 2009
हृदय फेकले तुझ्या दिशेने....
हृदय फेकले तुझ्या दिशेने
झेलाया तू गेलीस पटकन्
गफलत झाली परि क्षणांची
पडता खाली फुटले खळ्कन्
हृदय फेकले तूही जेंव्हा
सुटले तेही,पडलेही पण
तुटले नाही-फुटले नाही
नाद निघाला केवळ खण्कन्
गोष्ट येवढी इथेच थांबे
अशा गोष्टींना नसतो नंतर
खळ्कन् आणि खण्कन् यांतील
कधी कुठे का मिटले अंतर
मन पोलादी नकोच तुजसम
असो असूदे काच जरीही
फुटून जाते क्षणी परंतु
गंजायाची भीती नाही
--- संदीप खरे.
झेलाया तू गेलीस पटकन्
गफलत झाली परि क्षणांची
पडता खाली फुटले खळ्कन्
हृदय फेकले तूही जेंव्हा
सुटले तेही,पडलेही पण
तुटले नाही-फुटले नाही
नाद निघाला केवळ खण्कन्
गोष्ट येवढी इथेच थांबे
अशा गोष्टींना नसतो नंतर
खळ्कन् आणि खण्कन् यांतील
कधी कुठे का मिटले अंतर
मन पोलादी नकोच तुजसम
असो असूदे काच जरीही
फुटून जाते क्षणी परंतु
गंजायाची भीती नाही
--- संदीप खरे.
आज दिवस आहे तुझा .....
आज दिवस आहे तुझा , मनमोकळे जगून घे..
उद्याची बात कशाला, मिळतील तेवढी फुले वेचून घे..
सुख म्हणजे प्राजक्त . .
अन दुःख म्हणजे सुखा व्यतिरिक्त
पण तुजे हे नेहमीचे आहे ..
रागावालीस की "चिमटे " घेण..
अणि मी आवेगाने " मिठीत " घेतल..
की तुज्या गालांच " गोमट' होण ..
खुप दिवसांनी तुझ्या डोळ्यात पाहिलं
मी मलाच हरवुन जाताना
अन हरवलेले काही क्षण
पुन्हा नव्याने वेचताना
खुप दिवसांनी तुज्या डोळ्यात पाहिल ..
खुप दिवसांनी तुला डोळे भरून पाहिले
तुझ्या नयानाची धार अजुन सुध्हा बोथट झाली नाहीये .
एवढ खरं.........!
आजही रेंगाळते आठवण मनी
आपण कसे भेटायचो रोजच्या ठिकाणी पण असे झाले आहे,
तुझेच शब्द मनात रुंजी घालताहेत
मी कुठे विचार करतेय तरीपण तुझेच विचार डोक्यात येतायत..
मी म्हटले...
तू येशील ?
तू म्हटले नाही
तरी पण मी वाट पाहणार हे विचारायल नको
अन तू ही येणार हे सांगायला नको
उगाच राहून राहून वाटते
तुला माळलेले गजरे उगाच " फेकून " दिले.
अग तेच तर होते सोबत ...
जेव्हा आपन एकमेकात " झोकुन ' दिले.
उगाच राहून राहून वाटते
अजुन ही गेली नहीं वेळ
आठवता तुझ्या स्मुर्ती
काहुर मनात दाटते
मलाही वाटते ,
एकदा बेवड्या सारखी 'लाउन' डुलाव!
लोक्कानी आपणहून वाट मोकळी करावी .
अणि आपन रस्त्यावर राजा सारख चालाव !
मलाही वाटते ,
एकदा बेवड्या सारखी 'लाउन' डुलाव!
लोक्कानी आपणहून वाट मोकळी करावी .
अणि आपन रस्त्यावर राजा सारख चालाव !
तसा मी पित नाही
अन पिल्यावर कुणाच्या बापाला भीत नाही
उद्याची बात कशाला, मिळतील तेवढी फुले वेचून घे..
सुख म्हणजे प्राजक्त . .
अन दुःख म्हणजे सुखा व्यतिरिक्त
पण तुजे हे नेहमीचे आहे ..
रागावालीस की "चिमटे " घेण..
अणि मी आवेगाने " मिठीत " घेतल..
की तुज्या गालांच " गोमट' होण ..
खुप दिवसांनी तुझ्या डोळ्यात पाहिलं
मी मलाच हरवुन जाताना
अन हरवलेले काही क्षण
पुन्हा नव्याने वेचताना
खुप दिवसांनी तुज्या डोळ्यात पाहिल ..
खुप दिवसांनी तुला डोळे भरून पाहिले
तुझ्या नयानाची धार अजुन सुध्हा बोथट झाली नाहीये .
एवढ खरं.........!
आजही रेंगाळते आठवण मनी
आपण कसे भेटायचो रोजच्या ठिकाणी पण असे झाले आहे,
तुझेच शब्द मनात रुंजी घालताहेत
मी कुठे विचार करतेय तरीपण तुझेच विचार डोक्यात येतायत..
मी म्हटले...
तू येशील ?
तू म्हटले नाही
तरी पण मी वाट पाहणार हे विचारायल नको
अन तू ही येणार हे सांगायला नको
उगाच राहून राहून वाटते
तुला माळलेले गजरे उगाच " फेकून " दिले.
अग तेच तर होते सोबत ...
जेव्हा आपन एकमेकात " झोकुन ' दिले.
उगाच राहून राहून वाटते
अजुन ही गेली नहीं वेळ
आठवता तुझ्या स्मुर्ती
काहुर मनात दाटते
मलाही वाटते ,
एकदा बेवड्या सारखी 'लाउन' डुलाव!
लोक्कानी आपणहून वाट मोकळी करावी .
अणि आपन रस्त्यावर राजा सारख चालाव !
मलाही वाटते ,
एकदा बेवड्या सारखी 'लाउन' डुलाव!
लोक्कानी आपणहून वाट मोकळी करावी .
अणि आपन रस्त्यावर राजा सारख चालाव !
तसा मी पित नाही
अन पिल्यावर कुणाच्या बापाला भीत नाही
Subscribe to:
Posts (Atom)