घर थकले संन्यासी हळू हळू भिंतही खचते
आईच्या डोळ्यांमधले नक्षत्र मला भासवते
ती नव्हती संध्या मधुरा, रखरखते ऊनच होते
धग ओढुनी संधेवानी आभाळ पसरले होते
पक्षांची घरटी होती : ते झाड तोडले कोणी
एक एक ओंजळी मागे असतेच झर्यांचे पाणी
मी भिऊन अंधाराला, अडगळीत लपूनी जाई
ये हलके हलके मागे त्या दरीतली वनराई
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment