Sunday, July 5, 2009

गाणं जगण्याचं

मरण येणार म्हणुन कोणी जगायचं थांबतं का?
जीव जडुन कोणी प्रेम करायचं थांबतं का?

कशासाठी भयाने
ग्रासुन जायचं?
फुलाच्या पत्येक क्षणी
नासुन जायचं?


सुकुन जाणार म्हणुन फुल फुलायचं थांबतं का?
मरण येणार म्हणुन कोणि जगायचं थांबतं का?
जीव जडुन कोणि प्रेम करायचं थांबतं का?

फुलुन येते संध्याकाळ;
रंगाची बाधा होते!
निळ्या निळ्या कॄष्णा साठी
सगळि सुष्टी राधा होते!


पाउल फसेल म्हणुन कोणि भुलायचं थांबतं का?
मरण येणार म्हणुन कोणि जगाय्चं थांबतं का?
जीव जडुन प्रेम कोणी करायचं थांबतं का?


ठुमरीच्या अंगाने
झरा जेंव्हा वाहू लागतो;
लाल केशरी सरगम जेंव्हा
फांदिवरुन गाउ लागतो!


झडून जाणार म्हणुन झाड झुलायचं थांबतं का?
मरण येणार म्हणुन कोणी जगायचं थांबतं का?
जीव जडुन कोणि प्रेम करायचं थांबतं का?

येणार असेल मरण तर येऊ द्यावं
जमलच तर लाडाने
जवळ घ्यावं!


हिरवं हिरवं रोप कधी रुजायचं थांबतं का?
मरण येणार म्हणुन कोणी जगायचं थांबतं का?
जीव जडुन कोणि पेम करायचं थांबतं का?

No comments:

Post a Comment