पोलादी मन माझे आणिक
काच स्वतःला म्हणवुन घेशी
सम्पवून स्वतःला होशी मोठा ....
मज फ़ुटण्याची मुभाच नाही
क्शणात झाला चुरा तुझा,
अन गफ़लत मझी जगास दिसली
तुला न लागो बोल म्हणुन रे
एकसन्ध मी दुनियेपुढय्ती.....
त्या काचान्ची नक्शी रेखुन
डाव मान्डुनी बसले आहे
घायाळ जरी केलेस तरिही
साज तुझा मी ल्याले आहे
खळ्कन् खण्कन् सादांमध्ये
राहीलास तू खोळंबुन राजा
चरे जिव्हारी उठता येथे
सुटे जन्म ना मरणवेदना
अशी कशी संपेल कहाणी
आठव जेव्हा तुझा सभोती
तू स्वर्गीचा मानकरी ,मी
झळ नजरांची सोसत आहे
गंजण्यात मज असे सौख्य अन्
ऐक सख्या कारण त्याचेही
पथिक सदा जरि दुनियेसम मी
तुझ्याविना कधि खुलले नाहि
तुझ्याविना झगमगले नाही
---------मानसी
Subscribe to:
Post Comments (Atom)
kavita todis tod aahe pun Sandip chi kavita jast vastvik vatate..
ReplyDeleteखळ्कन् आणि खण्कन् यांतील
कधी कुठे का मिटले अंतर