Saturday, July 11, 2009

किनारा तुला पामराला!

हजारो जिव्हा तुज्या गर्जू दे प्रतिध्वनीने त्या,
समुद्र,डलमलू दे तारे !
विरत वादल हेलकावू दे पर्वत पान्याचे
दलु दे दिशाकोन सारे !

ताम्रसुरा प्राशुन माजुदे दैत्य नभाम्धले
ददुद्या पाताली सविता
आणि तयाची ही अधिरानी दुभंग धरनिला
कराया पाजलुदे पलीता!

की स्वर्गातुन कोसललेला,सुढ़समाधान
मिलाल्या प्रमत्त सैतान
जमवुनी मेला वैताल्यांचा या दर्यावर्ती
करी हे तांडव थैमान!

पदच्युता तव भीषण नर्तन असेच चालू दे
फुटूदे नभ माथ्यावर्ती
आणि तुटूदे अखंड उल्का वर्षावात अग्नी
नाविका ना कुटली भीती !

सह्कार्यानो,का ही खंत जन्म खलाशांचा
झुजन्या अखंड संग्राम
नक्शत्रापरी असीम निलामधे संचारावे
दिशांचे आम्हाला धाम!

काय सागरी तारू लोटले परताया मागे
असे का हा अपुला बाणा
त्याहून घेऊ जली समाधि सूखे,कशासाठी
जपावे पराभूत प्राणा!

कोटयावधि जगतात जीवाणु जगती आणि मरती
जशी ती गवताची पाती,
नाविक आम्ही परन्तु फिरतो सात नभाखाली
निर्मितो नव क्षितिजे पुदाहती!

मार्ग आमुचा रोखू शकती न धन,न दारा
घराची वा वितभर कारा
मानवतेचे निशान मिरवू महासागरात
जिंकुनी खंड खंड सारा!

चला उभारा उंच शिडे ती गर्वाने वरती
कथा या खुल्या सागराला
अनंत अमुची धेयासक्ती अनंत अन आशा
किनारा तुला पामराला!
-कुसुमाग्रज

No comments:

Post a Comment